रायगड : दापोली येथून महाबळेश्वरला निघालेल्या मिनीबसला आंबेनळी घाटात भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना समोर आलीयं. या भयंकर दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय.केवळ एक प्रवासी या अपघातातून सुदैवानं वाचलाय. प्रकाश सावंतदेसाई असं या प्रवाशांचं नाव आहे. हाती लागलेल्या सर्व मृतदेह आणि जखमी झालेल्या प्रकाश सावंतदेसाई यांना पोलादपूरच्या ग्रामीम रुग्णालयात हलवण्यात आलं.