रायगड : अवकाळी पावसाने रायगड जिल्हयाच्या काही भागाला मंगळवारी चांगलंच झोडपलं. जिल्हयाच्या महाड पोलादपूर तालुक्यात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पोलादपूर तालुक्यातील कामथी परीसरात गारांचा पाउस झाला. आजच्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असला तरी यात आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झालं. याशिवाय वीटभटटयांना या पावसाचा फटका बसला आहे.
महाडमध्ये छपरं उडून घरांचे नुकसान झालं. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. तर चिपळूणलाही वादळासह पावसाचा तडाखा बसला त्यामुळे अनेक ठिकाणी वादळामुळे नुकसान झालं...संध्याकाळपासून शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाची संततधार कोसळतेय .अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत.
दरम्यान, एका बाजूला अवकाळी पाऊस झोडपत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाढत्या तापमानामुळे नागरिकांची आणि प्राण्याची काहीली होत असल्याचे चित्र आहे. चंद्रपूर शहरात या उन्हाळ्यातील सर्वाधीक तापमानाची नोंद, ४४.६ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद, २ दिवसात पारा ४.६ अंशांनी वाढला. वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. तर, बुलढाणातल्या खामगावमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झालीय.