मुंबई : राज्यातील लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
केंद्र शासनप्रमाणे राज्य शासनदेखील लघु-मध्यम-सुक्ष्म उद्योगांना मदत करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाणार आहे.
याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू झाले असून त्यात १३ लाख कामगार रुजू झाले आहेत. ४३ हजार कारखान्यांनी परवाने मागितली आहे.
रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार व दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत १ जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते.