ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे

ST Mahamandal Bus: दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली आहे

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 14, 2024, 09:00 AM IST
 ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसे title=
st mahamandal bus will rise ticket price ahead of diwali

ST Mahamandal Bus: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीसाठी नातेवाईकांकडे जाण्यासाठी किंवा महिलांची माहेरी जाण्याची लगबग असते. गावा खेड्यात प्रवासाचे सुरक्षित साधन म्हणजे एसटीच आहे. मात्र, आता ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागणार असल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात 10 टक्के वाढ केली आहे. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसकरिता 25 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार आहे. 

एसटी महमंडळाने साधी, निमआराम, शयन, आसनी, शयनयान वातानुकूलित, शिवाई, शिवशाही (आसनी) आणि जनशिवनेरी बससेवेसाठी भाडे वाढवले आहे. एक महिन्यासाठी ही भाडेवाढ कायम राहणार आहे. त्यानंतर हंगाम संपल्यानंतर 26 नोव्हेंबरपासून भाडे पूर्ववत होणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, सहा किमीचा एक टप्पा असतो. त्यानुसार साध्या बसचे भाडे ८.७० रुपये आहे. त्यात दहा टक्के वाढ झाली असल्याने ९.५५ रुपये म्हणजे एकूण दहा रुपये एका टप्प्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहेत.

अशी होईल भाडेवाढ

- साधी आणि जलदचे तिकीट सध्या प्रति टप्पा (६ किमी) ८.७० रुपये आहे. १० टक्के भाडेवाढ धरून ती ९.५५ रुपये होईल.

- निमआराम, स्लिपर ११.८५ वरून १३.०५ रुपये होईल. 

- ई बसचे तिकीट सध्या १२.३५ रुपये आहे ते १३.६० रुपये होईल.
शिवाई व शिवशाहीचे तिकीट २२.३५ वरून १३.६० होईल.

- शिवनेरीचे तिकीट १२.९५ वरून १४.२५ रुपये होईल.

लालपरीच्या ताफ्यात  2500 गाड्या दाखल होणार

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 बसगाड्या आहेत. त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे.  त्यापैकी 5000 गाड्या एलएनजीमध्ये आणि 1000 गाड्या सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटीचा ताफा आणखी वाढविण्यात येणार आहे. 

एअर होस्टेसच्या धर्तीवर `शिवनेरी सुंदरी´

पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी´ नेमणार आहे.