शासकीय आश्रमशाळा अधिक्षकाची दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा-या नानीवली शासकीय आश्रमशाळेचे अधिक्षक नामदेव मुंडेंनी दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण केलीय. लाईट नसल्यानं वर्गखोल्यांमध्ये गरम होत होतं शिवाय डासही चावत होते म्हणन विद्यार्थी बाहेर येऊन बसले आणि हे पाहुन अधिक्षक मुंडेंनी मुलांना मारायला सुरूवात केली. त्यावेळी मुंडे दारुच्या नशेत होते. 

Updated: Sep 16, 2017, 08:55 PM IST
शासकीय आश्रमशाळा अधिक्षकाची दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण  title=

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणा-या नानीवली शासकीय आश्रमशाळेचे अधिक्षक नामदेव मुंडेंनी दारुच्या नशेत विद्यार्थ्याला मारहाण केलीय. लाईट नसल्यानं वर्गखोल्यांमध्ये गरम होत होतं शिवाय डासही चावत होते म्हणन विद्यार्थी बाहेर येऊन बसले आणि हे पाहुन अधिक्षक मुंडेंनी मुलांना मारायला सुरूवात केली. त्यावेळी मुंडे दारुच्या नशेत होते. 

निलेश मातेरा या नववीतल्या विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. निलेशला कासामधल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापूर्वीही मुंडेंनी अशाप्रकारे मारहाण केल्याचं यावेळी विद्यार्थ्य़ांनी सांगितलंय. याप्रकरणी कारवाई न केल्यास आश्रमशाळेला टाळ ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे, तर येवढी मोठी घटना घडूनही मुख्याध्यापकांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला.