SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ 

Updated: Jul 16, 2021, 01:27 PM IST
SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी title=

मुंबई : कोरोनाकाळात परीक्षा न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. दुपारी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाने निकाल जाहीर केला होता. (SSC Result 2021 : Maharashtra Board 10th Students Result Website Crash )  त्यानंतर 1 वाजता वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकत होेते. मात्र आता वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. साधारणतः 16 लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट क्रॅश झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे  हा निकाल तयार करण्यात आला आहे.  १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार आहे. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

प्रथमच कोरोना महामारी संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. परिणामी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आले. अकरावी प्रवेशांसाठी ऐच्छिक सीईटी घेतली जाणार आहे.

दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.

विद्यार्थी कोठे आणि कसा पाहणार दहावीचा निकाल?

http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे.  विद्यार्थी कोठे पाहू शकणार निकाल?  http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.