Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंवर आरोप करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना घेतलं ताब्यात

रणजितसिंह डिसले यांच्यावरील आरोपांनंतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते

Updated: Nov 1, 2022, 07:39 AM IST
Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंवर आरोप करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास लाच घेताना घेतलं ताब्यात title=

Ranjitsinh Disale : सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेचे (ZP) वादग्रस्त शिक्षण अधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांना लाचलुचपत विभागाने (ACB) ताब्यात घेतलं आहे. 25 हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्यावरील आरोपांनंतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. त्यानंतर आता लोहार यांच्यावरच कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार (Kiran Lohar) यांनी पन्नास हजार रुपये लाचेची (bribe) मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाचलुचपत विभागाने (ACB) त्यांना लाच स्विकारताना ताब्यात घेतलं आहे. तक्रार मिळाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी सोलापूर जिल्हा परिषदेत सापळा लावला होता. तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांना पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांनीच रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ग्लोबर टीचर पुरस्कारप्राप्त रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा दिला होता (global teacher ranjitsinh disale guruji resigns). रणजितसिंह डिसले यांनी माढा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे 7 जुलै 2022 रोजी राजीनामा सादर केला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी याबाबत माहिती दिली. सातत्याने गैरहजर राहिल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेने रणजितसिंह डिसले यांच्याबाबत चौकशी अहवाल तयार केला होता. शिक्षण विभागाने हा अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे दिला. मात्र कारवाई होण्याअगोदरच ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी राजीनामा मंजूर व्हावा, असे पत्र गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर केले होते.