पक्के वैरी आमने-सामने! नाग आणि मुंगुस एकमेकांशी भिडले; कोण जिंकलं पाहा व्हिडीओ

नाग आणि मुंगुसाची भरपावसात लढाई, कोण जिंकलं मुंगुस की साप? पाहा व्हिडीओ

Updated: Sep 9, 2021, 04:50 PM IST
पक्के वैरी आमने-सामने! नाग आणि मुंगुस एकमेकांशी भिडले; कोण जिंकलं पाहा व्हिडीओ title=

अकोल: साप आणि मुंगुस यांचं वैर सर्वांनाच ठाऊक आहे. एकामेकांशी मरेपर्यंत त्यांचं युद्ध सुरू राहातं. कधी सापाला तर कधी मुंगसाला आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागतो. मुंगुस कायमच या लढाईत वरचढ ठरतो असं अनेकदा पाहायला मिळतं. या साप आणि मुंगुसाच्या लढाईचा थरार पाहाणं फार रंजक असतं.

साप-मुंगुसाचं वैर म्हंटल की डोळ्यासमोर येतंय त्यांचं टोकाचं वैर. पावासामुळे आता अनेक घरांमध्ये किंवा बाहेर साप दिसत आहेत. अशावेळी मुंगसाच्या वाटेत आलेल्या सापासोबत झालेली लढाई पाहायला मिळाली आहे. भरपावसात साप आणि मुंगसाच्या लढाईचा थऱार पाहायला मिळाला.

वरुन पाऊस सुरू असतांनाच साप-मुंगुसाच्या लढाईचा 'लाईव्ह' थरार 'पार्डीकरां'नी पाहिला आणि आनुभवलाही. अगदी रस्त्याच्या मध्ये हे जीवघेणं युद्ध सुरु होतं.  अखेर मुंगुसानं या भल्या मोठ्या नागाला ठार मारत ही लढाई जिंकली. ही लढाई जवळपास दहा मिनिटे चालली असावी असं स्थानिकांनी सांगितलं.

स्थानिकांनी हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे. भरपावासातील या युद्धात अर्थातच पुन्हा एकदा नागासमोर मुंगुस वरचढ ठरलं आहे. हा सारा थरार अगदी अंगावर काटा आणणारा होता.