नाशिक : शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोप-यातून साईभक्त येत असतात. या साईभक्तांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे.
आता शिर्डीला जाण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि हैदराबादहून दररोज सहा विमानं सोडली जाणार आहेत. त्यामुळे अनेक साईभक्तांचा प्रवास आणखी सुखकर आणि सोपा होणार आहे. यासोबतच अनेकांचा मोठा वेळ वाचणार आहे.
या विमानाचे दर काय असतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या नव्या घोषणेनुसार दरदिवशी शिर्डीसाठी मुंबईहून चार, दिल्लीहून एक विमान सुटेल. ट्रुजेटचं खाजगी विमान शिर्डी आणि हैदराबाद या दरम्यान उड्डाण करेल. विमानाचे दर काय असतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून संमती मिळाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून ही विमान उड्डाणं सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य हवाई वाहतूक सचिव वल्सा नायर सिंग यांनी डीजीसीएची अंतिम परवानगी बाकी असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.