Video: सिद्धेश्वर मंदिरावर नागाच्या रुपात पक्षांचा थवा, पाहा अद्भूत नजारा

900 वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरमधल्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात, राज्याबरोबरच परराज्यातील भाविकांचीही मोठी गर्दी

Updated: Jan 16, 2023, 05:54 PM IST
Video: सिद्धेश्वर मंदिरावर नागाच्या रुपात पक्षांचा थवा, पाहा अद्भूत नजारा title=

सोलापूर : सोलापूरचं (Solapur) ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला (Siddharameshwar Yatra Solapur) सुरुवात झाली आहे. या यात्रेला 900 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला राज्यभरातून हजारो भाविक (Devotee) गर्दी करतात. कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष ही यात्रा बंद होती. पण आता कोरोनाचं सावट कमी झाल्याने या वर्षी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी होतेय. रात्री 12.5 मिनिटांनी हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होणार आहे.

सिद्धेश्वर मंदिरावर अद्भूत नजारा
दरम्यान या यात्रा काळात भाविकांना एक अद्भूत नजारा पाहिला मिळाला. पक्षांचा एक मोठा थवा सिद्धेश्वर मंदिरावर (Siddheshwar Temple) गिरट्या घालत होता. पाहाता पाहाता तो पक्षांचा थवा वेगवेगळे आकार बदलत होता. आणि थोड्यावेळातच या पक्षाने भल्या मोठ्या नागाचा आकार घेतला. उपस्थितांनी हे दृश्य मोबाईलमध्ये कैद केलं आहे (Amazing video captured in mobile). हा नजारा पाहूनजणू नागराज सिद्धेश्वर स्वामींच्या दर्शनाला आले असाच भास होत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान वायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

भाविकांची मोठी गर्दी
सुमारे 900 वर्षांची परंपराअसलेल्या या यात्रेचं आबालवृद्धांना मोठं आकर्षण असतं. महाराष्ट्रासह (Maharashtra), कर्नाटक (Karnatak), मध्यप्रदेश (MadhyaPradesh), आंध्रप्रदेशमधून (Andhra Preadesh) असंख्य भाविक या यात्रेला हजेरी लावतात. नंदीध्वजांची मिरवणूक हा यात्रेचा सर्वात महत्वाचा आणि आकर्षणाचा भाग असतो. यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी जनावरांचाही मोठा बाजार भरतो. यात खिलार जनावरं, जर्सी गाय आणि म्हशीचं प्रदर्शन भरवण्यात येतं.