पुणे : पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे याच्याकडे लाखो रुपयांची रोकड, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे - सोलापूर मध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. श्रीपती मोरेला पुणे अँटीकरप्शन विभागाने पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती.
एसीबीने गुरुवारी संध्याकाळी मोरेच्या कार्यालयातच ही कारवाई केली. त्यानंतर, मोरेच्या पुण्यातील घरात एसीबीने झडती घेतली. त्यात ३८ लाख ३३ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याचबरोबर, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे - सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहीती एसीबीच्या तपासात पुढे आली आहे.
श्रीपती मोरेने नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केली असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली असल्याचे, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेनामी मालमत्तांचा शोध एसीबी घेत आहे.