Sangli Accident: आईशिवाय आपलं या जगात काहीचं होऊ शकतं नाही. लहान मुलाला जशी आईजवळ (Mother Saves Children) लागते तशीच ती आपल्याला आपल्या उतारवयातही लागतं असते. प्राण्यांमध्येही आपण पाहतो आई आपल्या पहिलांचे रक्षण करण्यासाठी कायम तत्पर राहते. सध्या असाच एक काळजाचा थरकाप उडवणारी (shocking news) बातमी समोर आली आहे. आपल्या मुलांचे प्राण वाचवण्याच्या नादात चक्क मुलांच्या आईनं जीव गमावला आहे. सध्या या बातमीनं सगळीकडेच हळहळ व्यक्त केली आहे. आपल्या मुलांना ट्रॅक्टरखाली येताना पाहून तत्क्षणी त्यांच्या आईनं धाव घेतली आणि तेवढ्यात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या दुर्देवी अपघातात मात्र आईला आपला जीव गमावावा लागला आहे. ऐन तारूण्यातच या आईला आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सध्या या प्रकारानं कुटुंबियांमध्ये शोक व्यक्त केला आहे. (Shocking Sangali News Mother dies While Saving Children when tractor runs over her body at Talwale Village)
सध्या सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. घरासमोर लहान मुलं खेळताना त्यांच्यासमोर उभा असलेल्या ट्रॅक्टरखाली (Tracker) ती येताना दिसताच आईचा जीव घाबरला आणि जीवाच्या आकांतानं ती तिच्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी धावली परंतु दुर्देव. त्या ट्रॅक्टरला लागलेल्या रॉडनं घात केला. त्या गाडीला लागलेला नांगराचा नाळ तिच्या डोक्यात घुसला आणि उपचारादरम्यान मात्र तिचा मृत्यू झाला. ती दोन्ही मुलं बचावली परंतु त्या माऊलींनं मात्र जीव गमावला आणि लेकरं पोरकी झाली. या बातमीनं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. संचिता संपत पाटील, वय 28, असं या मृत महिलेचं नावं आहे. तडवळे येथील त्या रहिवासी होत्या.
मृत महिलेच्या परिवाराकडे त्यांचा एक ट्रॅक्टर होता. तो नेहमीप्रमाणे मंगळवारीही रस्त्याच्याकडेला उभा होता. मंगळवारी दुपारी 4 च्या दरम्यान संचिता संपत पाटील या अंगणातील गोठा साफ करत होत्या. दोन्ही मुलं ही 2 आणि 4 वर्षांची होती. रस्त्यावर उतार होता त्यामुळे तो ट्रक अचानक सरकला आणि (Mother dies while saving the children) त्या मुलांच्या दिशेनं वळवला.
हेही वाचा - Girl Dance Video : लेहेंगा घालून सायकलवर नृत्यबजलीची अदाकारी! पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल!
संचिता यावेळी आरडाओरडा करू लागल्या. तेवढ्यात त्यांच्या मुलांकडे ट्रक येताना पाहून त्या घाबरल्या आणि त्यावेळीच त्यांनी त्यांच्या मुलांकडे धावल्या. परंतु तेवढ्यात त्यांचा पाय सरकला आणि त्या नांगराच्या नाळाला जाऊन धडकल्या. त्यावेळी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी तातडीनं त्यांना रूग्णालयात नेले परंतु उपचारादरम्यान त्यांना दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्यावर त्यांच्या गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घडल्या प्रकारांबद्दल पोलिस तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू, सासरे, दीर आणि भावजय असा मोठा परिवार आहे.