धक्कादायक! वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला

विद्यार्थी आणि शिक्षकांसमोरच तो हत्यार घेऊन वर्गात शिरला, पुण्यातील धक्कादायक घटना

Updated: Mar 14, 2022, 01:26 PM IST
धक्कादायक! वर्गात घुसून दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला title=

पुणे : वर्गात घुसून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर आरोपीने धारदार शस्त्राने हल्ला केला.

पुण्याच्या वडगाव शेरी हद्दीत ही धक्कादायक घटना घडली असून हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.

याप्रकरणी शास्त्रीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नेमकी घटना काय?
इयत्ता दहावीत शिकणारी ही मुलगी असून आज शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ होता, या निमित्ताने ती आज शाळेत आली होती. 

यावेळी मुलीवर एकतर्फी प्रेम करणारा मुलगा थेट वर्गात शिरला आणि त्याने मुलीवर हल्ला केला. याआधीही या मुलाने अनेकवेळा त्या मुलीला त्रास दिल्याची माहिती पुढे आली आहे.