धक्कादायक, जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमधील संगणक प्रणाली हॅक, चार दिवस काम बंद

 JNPT container terminal computer system hack : अज्ञात हॅकरने न्हावाशेवा येथील जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमधील संगणक प्रणाली हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. 

Updated: Feb 26, 2022, 02:08 PM IST
धक्कादायक, जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमधील संगणक प्रणाली हॅक, चार दिवस काम बंद title=

नवी मुंबई : JNPT container terminal computer system hack : अज्ञात हॅकरने न्हावाशेवा येथील जेएनपीटी कंटेनर टर्मिनलमधील संगणक प्रणाली हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सनी यंत्रणा हॅक केल्यानं मागील चार दिवसांपासून यंत्रणा बंद पडली आहे. (computer system hacked in JNPT container terminal, four days off work)

ही संगणक प्रणाली कुणी आणि कशामुळे हॅक केली? हे अद्याप समजू न शकल्याने संगणक तज्ज्ञांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. या प्रकारामुळे जेएनपीटी कंटेनर टर्मिनल्सचे कामकाज ठप्प पडल्याने येथील कंटनेर टर्मिनलचे कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरु ठेवण्याची वेळ आली.

न्हावाशेवा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात हॅकर विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.