महाराष्ट्रातील 23 हजार महिला अजूनही बेपत्ता

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर 

Updated: Dec 22, 2021, 08:57 AM IST
महाराष्ट्रातील 23 हजार महिला अजूनही बेपत्ता title=

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 23 हजार महिला गायब झाल्याची नोंद आहे. महिलांवरील अत्याचारांचा मुद्दा कमालीचा ऐरणीवर आला आहे. या महिलांबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. 

गेल्यावर्षी राज्यातून ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या. त्यापैकी 23 हजार महिलांचा शोधच लागलेला नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालात ही धक्कादायक बाब उघड झालीय. गेल्यावर्षी राज्यात २ हजार १६३ खून झाले त्यापैकी ५६४ खून महिलांचे झालेत. प्रेमप्रकरणातून ११६ तर अनैतिक संबंधांतून १८३ जणींची हत्या झाली.

हुंड्यासाठीही विवाहितांचे जीव घेतल्याचं दिसून येतंय. या हत्याकांडांमुळे खळबळ उडालीय. गेल्या ११ महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी ९९९ गुन्हे नोंदवले गेले. त्यापैकी ८५९ गुन्ह्यांची उकल झाली. मात्र १४० मुलींचं गूढ कायम आहे.