नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन सुरू झाल्याबरोबर शिवसेनेने चीन मुद्दयावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा असा चिमटाही sanjay raut संजय राऊत यांना राज ठाकरेंना काढला.
चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्य़ाचा प्रयत्न केला का, याबाबतचं निवेदन केंद्रानं सभागृहात करावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाबाबत माहिती देत यंदाच्या वर्षी भरगच्च सभागृह नसेल पण कामकाज होईलच अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी चीन मुद्द्यावरुन त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले.
विस्कटलेल्या आर्थिक घडीबाबत शिवसेना जाब विचारणार, असं म्हणत केंद्रातील सत्ताधाऱ्यांबाबत वक्तव्य केलं. 'केंद्रात कोणतं सरकार आहे याच्याशी सैन्याच्या मनोधैर्याचा संबंध नाही. सरकार कोणाचंही असलं तरी सैन्य लढतंच. सैन्याच्या पाठीशी सारा देश उभा राहीला आहे', असं राऊत म्हणाले.
चीनला धडा शिकवण्यासाठी म्हणून चीनी मोबईल ऍप आणि 'पबजी' बॅन करण्याच्या केंद्रयाच्या निर्णयावर टीका करत, पबजी बॅन करुन चीन मागे हटत नाही; असा टोला राऊतांनी लगावला.
राज ठाकरे यांच्याविषयी बोलले....
राऊतांनी यावेळी राज ठाकरे यांनाही नाव न घेता सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. 'नवी पिढी मराठीपण विसरली आहे. इतर नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा. आमच्या आवाहनाला टाईमपास समजू नये, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला कमी लेखावं हे चालणार नाही. दिल्लीतील नेत्यांनीही भूमिका' घ्यावी असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा अपमान होत असताना गप्प बसत असले तर ते मराठी आहेत का ? असा खडा सवाल करत, शिवसेना ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची गंगोत्री आहे असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं.
राज्यपाल- कंगना भेटीवर म्हणाले...
अभिनेत्री कंगना राणौत हिनं मुंबईत आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ज्याविषयी सातत्यानं कंगनाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेतर्फे राऊतांनी पुन्हा एकदा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. 'राज्यपालांकडे लोक येत जात असतात. पण, मला माहित नाही कोण भेटलं. या साऱ्याची नोंद ठेवणारी यंत्रणा भाजपकडे आहे', असा टोला त्यांनी लगावला.