नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं उभारण्यात येणा-या ऑईल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. 

Updated: Jan 11, 2018, 08:40 PM IST
नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी  title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं उभारण्यात येणा-या ऑईल रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा आमनेसामने उभे ठाकलेत. गुजरातच्या लँड माफियांनी कवडीमोलानं शेतक-यांकडून जमिनी खरेदी केल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय. आरोप करणा-यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, असं आव्हान तावडेंनी दिलंय.