सांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचा मोर्चा

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात काल महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येतंय. 

Updated: Jan 4, 2018, 02:04 PM IST
सांगलीत संभाजी भिडेंवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचा मोर्चा title=

सांगली : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या विरोधात काल महाराष्ट्र बंद पाळण्यात आला. आता संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन करण्यात येतंय. 

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे जबाबदार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. आता हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. 

सांगलीत मारुती चौकात शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथून ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन गेले. सध्या परिसरात प्रचंड तणाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.