शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी

शिवाजी महाराजांची जयंती शासनाकडून सध्या तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते.

Updated: Dec 15, 2017, 08:28 PM IST
शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी title=

नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार सुरेश हळदणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करावी, अशी मागणी केली. या मागणीनंतर विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला. शिवाजी महाराजांची जयंती शासनाकडून सध्या तारखेप्रमाणे साजरी करण्यात येते.

शेतीच्या प्रश्नांना कधी मिळेल वेळ?

शेतीच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी, पुन्हा शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद पुढे आणण्याचा हा प्रय़त्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण भाजप आमदार सुरेश हळदणकर यांनी केलेल्या मागणीनंतर, विरोधकांनी या मागणीला जोरदार विरोध केला आहे. एकंदरीत जयंती तिथीप्रमाणे किंवा तारखेप्रमाणे हा वाद मिटत नाही आणि अधिवेशनाची वेळही निघून जाते.

जयंती पुण्यतिथीप्रमाणे साजरी करण्याची मागणी

कारण हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल, याकडे सर्वांचं लक्ष असताना, अचानाक शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचा प्रश्न समोर आला आहे. भाजपचे आमदार सुरेश हळदणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करावी, अशी मागणी केली आहे.