यवतमाळमध्ये शिवसेनेते गटबाजी उफाळली

विदर्भातील शिवसेनेचे शक्तीस्थान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळली आहे.

Updated: Jul 28, 2017, 11:37 PM IST
यवतमाळमध्ये शिवसेनेते गटबाजी उफाळली title=

यवतमाळ : विदर्भातील शिवसेनेचे शक्तीस्थान असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळली आहे, दोन नेत्यांमधील वाद आता मातोश्रीवर पोहोचला आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांचे दोन गट शिवसेनेत उभे ठाकले आहेत. 

मनसेमधून शिवसेनेत आलेल्या पराग पिंगळे यांना शिवसेना नेतृत्वाणे अचानक बढती देत जिल्हाप्रमुख पद बहाल केल्याने जुने शिवसैनिक नाराज झाले. पिंगळे हे संजय राठोड समर्थक समजले जातात. राठोड यांनी जुन्यांना डावलून आणि खासदार भावना गवळींना विश्वासात न घेता नियुक्त्या केल्याने काही नाराज पदाधिकारी गवळीच्या नेतृत्वात मातोश्रीवर धडकले. 

या गटबाजीमुळं शिवसैनिक संभ्रमित झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्या वादावर कसा पडदा टाकतात याकडे सामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.