Sharad Pawar Candidate Win Shared Ajit Pawar Video: पुण्यातील शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी विजय मिळवला आहे. अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला आहे. अमोल कोल्हेंनी सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांना धूळ चारली आहे. कोल्हे 1 लाख 54 हजार मतांनी विजयी झाले आहेत. ही निवडणूक अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय मिळवल्यानंतर कोल्हेंनी चक्क त्यांचे विरोधक असलेल्या अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
"आव्हान सोपं नव्हतं... दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं," अशी कॅप्शन देत अमोल कोल्हेंनी अजित पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिताना, "मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला," असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
आव्हान सोपं नव्हतं...
दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं.मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली,… pic.twitter.com/yc7hVCcDrp
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 4, 2024
पोस्टच्या शेवटी अमोल कोल्हेंनी, "हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो" असं म्हटलं आहे.