शिर्डी : शिर्डीत मोठया प्रमाणात साईभक्त दर्शनासाठी येतात. त्यांना या ना त्या कारणाने लुटण्याच्या प्रमाणात दिवसें दिवस वाढ होतांना दिसून येतय.
आता साईभक्तांना व्हीआयपी दर्शनाचे पासेसच बनावट बनवून फसविल्याचा प्रकार उघडकीस आलाय. २६ जानेवारी दरम्यान गर्दीचा फायदा घेत भक्तांना बनावट पास विक्री करणा-या शिर्डीतील लक्ष्मी नगर भागातील विजय वाडेकर, रविंद्र रणदिवे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर गुन्हा दाखल केला असुन त्यांना कोर्टा समोर हजर केल असता आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साई मंदिर चार तास बंद राहणार आहे. खग्राह चंद्रग्रहणामुळे ३१ जानेवारीला मंदिर बंद राहणार आहे. संध्याकाळी पाच ते रात्री ८.४२ या कालावधीत साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. साई संस्थाननं याबाबतची माहिती दिलीय.
कोपरगाव येथील साई बालाजी ट्रस्टच्या वतीने मागील दहा वर्षांपासून श्री साई बालाजी पालखी तिरूपतीला नेली जाते. यामध्ये सुमारे १५०० भाविक दरवर्षी सहभागी होतात. हे पालखी सोहळ्याचं १०वं वर्ष असून ह्यावर्षीच्या पालखीचं कोपरगाव येथून स्वतंत्र रेल्वेने तिरूपतीकडे प्रस्थान झालं. शिर्डीचे साईबाबा आणि तिरूपतीची ही भेट होणार आहे.