अभंगवारी : वारीतील 'मेंढी रिंगण' सोशल मीडियावर व्हायरल

पाहा हा अफलातून व्हिडिओ

अभंगवारी : वारीतील 'मेंढी रिंगण' सोशल मीडियावर व्हायरल  title=

मुंबई : 'अभंगवारी' च्या माध्यमातून झोवीस तास डॉट कॉम वाचकांना वारीतील वेगवेगळे पैलू, वारीतील वेगवेगळ्या छटा दाखवत आहेत. तसेच वारीची इत्तमभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच एक वारीतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगले हिट्स मिळत आहे. हा व्हिडिओ खूप चांगले हिट्स मिळवत आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण इंदापुरात पार पडणार आहे. कदम विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११च्या सुमारास हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. 

14 जुलै रोजी काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे हे देखील मेंढी रिंगण आहे. हे रिंगण कुठंच आणि कधीचं याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाही. पण सोशल मीडियावर या व्हिडिओला अधिक पसंती मिळत आहे.

या व्हिडिओतून असं दिसतंय की, मेंढ्या घेऊन जाणारा एक मेंढपाल पालखीला बघून थांबला. आणि त्याने आपल्या मेंढ्यांसोबत या पालखीला रिंगण घातलं. हे दृष्य पाहताच उपस्थित वारकरी खूप भावूक झाले. त्यांनी विठ्ठल विठ्ल असा जयघोष करून पंढरीनाथ महाराज की जय असा नामघोष केला.