पास करण्यासाठी प्राध्यापकानं विद्यार्थीनीकडे केली शरीरसुखाची मागणी

संदीप कांबळे असं शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: May 2, 2018, 10:34 PM IST

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वडगाव परिसरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाने विद्यार्थिनीला पास करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. संदीप कांबळे असं शिक्षकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संदीप कांबळे हा विद्यार्थिनीला फोन करून 'तुला पास व्हायचं असेल तर आपण एका लॉजवर जाऊ, मग मी तुला पास करतो' म्हणून फोन करत होता. शिक्षकाच्या अशा मागणीने घाबरलेल्या विद्यार्थिनीने याची माहिती आई-वडिलांना दिली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.