दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण

राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.

Updated: Oct 16, 2017, 08:30 PM IST
दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान पूर्ण title=

मुंबई : राज्यात आज दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आलं. दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं.

आजच्या मतदानाला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसलं. या टप्प्यात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती आहेत. राणेंनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र गट स्थापन केलाय. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलंय.

तर दुसरीकडे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सांगली जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींमध्येही निवडणुका आहेत. त्यामुळं खोत समर्थक किती ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध करतात याचीही उत्सुकता आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या ग्रामपंचायतींची सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत.