पर्यटकांना मोठी पर्वणी, सवतकडा धबधबा ओसंडून वाहतोय !

Savatkada waterfall Overflow : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.  

Updated: Jun 28, 2022, 09:26 AM IST
पर्यटकांना मोठी पर्वणी, सवतकडा धबधबा ओसंडून वाहतोय ! title=

रत्नागिरी : Savatkada waterfall Overflow : कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनासाठी आपसूकच पावले धबधब्यांकडे वळतात. असाच कोकणात राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. यात स्वतःला डुंबून घेत हे तुषार अंगावर झेलत पर्यटनाचा आनंद घेण्याची आतुरता अनेकांना असते.

कोकणात राजापूरातला सवतकडा धबधबा ओसंडून वाहत आहे. राज्यात म्हणावा तसा पाऊस अजून सुरु झालेला नाही. पण कोकणात पावसानं दमदार हजेरी लावलीय. चारी बाजूला हिरवळ त्यात दाट धुकं आणि ओसंडून वाहणारे धबधबे असा स्वर्गिय अनूभव तुम्हाला घेता येईल. दीडशे दोनशे फुटांवरून कोसळणारा सवतकडा धबधबा वर्षा पर्यटनासाठी तुमची वाट पाहतोय. मुंबई गोवा महामार्गवर असलेल्या तिवंडामाळ गावातून फक्त 5किमी अंतरावरचा हा धबधबा आहे.

आपण वर्षा पर्यटनासाठी कोकणात जात असाल तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. कोकणात पावसाने दमदार लावली असून कोकणच्या सौंदर्यात भर पडली आहे.चारी बाजूला हिरवळ त्यात दाट धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे जणू स्वर्गची अनुभूती, राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध सवतकडा धबधबा देखील प्रवाहित झाला आहे. दीडशे दोनशे फुटांवरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे. फेसाळणारा धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे हजेरी लावत आहेत.

मुंबई - गोवा या महामार्ग वर असलेल्या तिवंडामाळ गावातून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणारा या कोकणातील फेसाळनारा धबधबा पर्यटकाना पुन्हा आकर्षित करत ठरत आहेत.  पण हे सगळे करत असताना आवश्यक ती काळजी घेऊनच धाडस टाळून स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.