तुषार तापसे, झी मीडिया
Satara Crime News: राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या आंधळी गाव दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. गावात राहणाऱ्या पती-पत्नीचा शेतात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या आंधळी गावात दुहेरी हत्याकांड घडला आहे. यामध्ये पती-पत्नीचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
रात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी हे दाम्पत्य शेतामध्ये गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने दोघांच्या डोक्यात व मानेवर वार करून त्यांची निर्घूण हत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर अज्ञात मारेकरी त्या ठिकाणाहून फरार झाला आहे. रात्रभर दोघांचेही मृतदेह शेतातच रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सकाळी गावकऱ्यांच्या हा सर्व प्रकार निदर्शनास आला. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित मारेकरी कोण आहे या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. तसंच, दाम्पत्याचा खून का करण्यात आला, याचे कारण देखील अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र, शेतातच हत्या करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका इराणी विद्यार्थ्याची फसवणूक करुन त्याला लुबाडण्यात आल्याची घटना घडली आहे. मुस्तबा हा मुळचा इराणी विद्यार्थी असून पुण्यात शिक्षणासाठी आला होता. भविष्य बघायला गेला असता काही चोरट्यांनी त्याला मारहाण करत लुबाडले आहे. तसंच, मोबाइल अॅपवरुन 95 हजार रुपये चोरट्यांनी ट्रान्सफर केल्याचे त्याने तक्रारीत म्हटलं आहे