साताऱ्यात खा. उदयनराजेंवर आ. शिवेंद्रसिंहराजेंची टीका

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज चक्क साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरले. 

Updated: Aug 30, 2018, 01:39 PM IST

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज चक्क साताऱ्यातील मुख्य रस्त्यावरील खड्डे भरले.  खा.उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात असलेल्या सातारा नगरपालिकेकडून खड्डे बुजवले जात नसल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  स्वखर्चाने साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र भोस चौकातील खड्डे बुजवले.

उदयनराजेंवर टीका 

यावेळी बोलताना आमदारांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करत नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नसल्याचा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.