विशाल करोळे, झी मीडिया, लातूर : मृत्यू कुणाला कधी कुठे? कसा गाठेल याचा काही नेम नाही. अशीच एक भयानक घटना लातुरमध्ये(latur) घडली आहे. पत्नीच्या सरंपच पदाच्या निवडणुकीचा(Election of Sarpanch) प्रचार करतानाच पतीचा मृत्यू झाला आहे. स्टेजवरच पत्नी समोरच पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमर नाडे असं मृत व्यक्तीचे नाव आहे. अमर यांची पत्नी अमृता नाडे सरपंचपदाची निवडणुक लढवत आहे. लातुर येथील मुरूड परिवर्तन पॅनेल तर्फे अमृता नाडे निवडणुक लञवत आहेत. पत्नीच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभेचे आयोजन केले होते. सभा सुरु असताना अमर नाडे यांचे भाषण करून ते स्टेजवर बसले होते. अचानक त्यांना चक्कर आली आणी ते खाली कोसळले.
यामुळे स्टेजवर एकच गोंधळ उडाला. तात्काळ अमर यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेमुळे मृत अमर यांच्या पत्नी अमृता नाडे यांच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. सर्वत्र प्रचाराचा जोर वाढला आहे. गावागावत ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. शासनाकडून मतदारांना 18 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली आहे.
खाजगी आस्थापनांनी सुट्टी शक्य नसल्यास किमान दोन तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्योग, उर्जा, कामगार विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत.