CM यांच्या मेहुण्यांवर ED कारवाई : राजकीय सुडापोटी हे सर्व सुरु - संजय राऊत

Sanjay Raut on Ed Action : राजकीय सुडबुद्धीने हे सगळे चालले आहे. तुम्हाला झुकवू शकतो. राजकीय वर्चस्व दाखविण्यासाठी, अशी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप  संजय राऊत यांनी केला आहे.

Updated: Mar 22, 2022, 07:42 PM IST
CM यांच्या मेहुण्यांवर ED कारवाई : राजकीय सुडापोटी हे सर्व सुरु - संजय राऊत title=
संग्रहित छाया

नागपूर : Sanjay Raut on Ed Action : राजकीय सुडबुद्धीने हे सगळे चालले आहे. आणि कोणतीही कायदेशीर बाजू न मांडता ही कारवाई होत आहे. तुम्हाला झुकवू शकतो. राजकीय वर्चस्व दाखविण्यासाठी, अशी ही कारवाई केली जात आहे, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि केंद्रातील सरकारवर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली. त्यांचे 11 फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर कडाडून हल्लाबोल चढवला. श्रीधर ठाकरे हे ठाकरे परिवारातील आहेत. महाराष्ट्रात अशा कारवायांना ऊत आला आहे. राक्षसी हुकुमशाहीची ही नांदी आहे. सुडापोटी कारवाई केली गेली आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (Rashmi Thackeray Brother Sridhar Patankar Ed Saized Flats In Thane)

न्याय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था या हुकमशाही प्रमाणे आणि गुलामासारख्या राबविल्या जात आहेत. मला केंद्रीय यंत्रणाची दया येत आहे. त्यांचे काय चुकत नाही. त्यांना जे सांगितले जात आहे, ते करत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. राजकीय सुडबुद्धीने कारवाई करून कोणतीही बाजू मांडू न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला. तुम्हाला झुकवू शकतो हे दाखवून देण्यासाठी अशा कारवाया होत असल्याचा आरोप केला. देशात ज्या ठिकाणी भाजप पराभूत झाला आहे त्या सर्वठिकाणी अशा कारवाया सुरू आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या 'पुष्पक ग्रुप'ची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ठाण्यामधील निलांबरी प्रोजेक्टमधील 11 फ्लॅट्स ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. (ED attaches properties worth Rs. 6.45 Crore in the demonetization fraud case by the Pushpak Group of companies)

या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आणखी संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे ईडीने ठाकरे कुटूंबही चौकशीच्या फेऱ्यात आल्याचे बोलले जात आहे. ईडीकडून 2017 मध्ये पुष्पक बुलियन्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वीही ईडीकडून 21 कोटींची मालमप्ता जप्तीची कारवाई झाली आहे.