Success Story : गायीच्या शेणानं बनवलं कोट्याधीश, या पट्ट्यानं असं केलं तरी काय?

Success Story of Prakash Imde:आज विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे. त्यामुळे अगदी वेस्टपासून बेस्ट म्हणजेच कचऱ्यापासून (Waste Management) चांगले उत्पादनही करता येतं आणि त्यातून आज बाजारात पुष्कळ पैसाही कमावता येतो आहे. एवढंच नाही तर आता शेतकरीही (Farming) चांगला व्यवसाय करत आहेत. 

Updated: Dec 23, 2022, 06:54 PM IST
Success Story : गायीच्या शेणानं बनवलं कोट्याधीश, या पट्ट्यानं असं केलं तरी काय? title=
Success Story

Success Story of Prakash Imde:आज विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्यानं पुढे जात आहे. त्यामुळे अगदी वेस्टपासून बेस्ट म्हणजेच कचऱ्यापासून (Waste Management) चांगले उत्पादनही करता येतं आणि त्यातून आज बाजारात पुष्कळ पैसाही कमावता येतो आहे. एवढंच नाही तर आता शेतकरीही (Farming) चांगला व्यवसाय करत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या जोडीनं आणि आधुनिक मार्केटिंगच्या नव्या वाटाही उघडल्यानं आता नवे होतकरू व्यावसायिक यातून चांगला पैसा कमावतं आहेत आता आम्ही तुम्हाला अशाच एका तरूणाची गोष्ट सांगणार आहोत ज्यानं चक्क गायीच्या दूधापासून आणि शेणापासून (Sucessful Business of Cow Milk and Dung) व्यापार करत कोट्यवधी रूपये कमावले आहेत. त्या तरूणाचे नावं आहे प्रकाश इमडे. या व्यावसायिकाची सेक्सेस स्टोरी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का तर बसेलच परंतु त्यांचा हा प्रवास ऐकून प्रेरणा मिळाल्याशिवायही राहणार नाही. 

प्रकाश इमडे हे सांगोला तालुक्यातील इमडेवाडीत (Sangola imdewadi) राहणारे एक तरूण शेतकरी आहेत. त्यांनी दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रूपयांचे उपन्न कमावले आहे. होय, फक्त दूध आणि शेण या दोनच गोष्टींतून त्यांनी कोट्यवधी रूपये व्यापारातून कमावले आहेत. ही गोष्ट वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ही गोष्ट खरी आहे. त्यांनी या मिळालेल्या उत्पन्नातून टोलेजंग आणि आलिशान असा एक कोटींचा बंगला बांधला आहे. गेली 20  वर्षे म्हणजेच 1998 सालापासून ते हा व्यवसाय सहकुटुंब सहपरिवार करत आहेत. 

किती आहे उत्पन्न?

प्रकाश हे एकटेच या व्यवसायात (Family) नसून त्यांचे कुटुंबही त्यांना हातभार लावते. त्यांची पत्नी सिंधूताई, मुलगा विजय आणि सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच त्यांनी बांधलेल्या गोठ्यात काम करतात. त्यांच्या गोठ्यात मजूरही कामाला आहेत. दूधातून त्यांना वर्षांला लाखोंचे उत्पन्न मिळते तर शेणातून 12 लाख रूपये मिळतात. पुर्वी 25 लीटर दूध प्रकाश यांना मिळत होते आता तेच 40 लीटरपर्यंत पोहचले आहे. चार एकर शेतीत प्रकाश नेमाडे यांनी दोन एकरमध्ये गोठा आणि बंगला बांधला आहे. तर उरलेल्या दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी जागा केली आहे. सुरूवातीला प्रकाश यांच्याकडे टॅंकरच्या पाण्यानं गायींचा सांभाळ केला. पण व्यवसायामुळे त्यांच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. गायींसाठी त्यांना चार ते पाच टन हिरवा चारा लागतो. 

हेही वाचा - Samantha Ruth Prabhu पेक्षा तिच्या बिकीनीच्या किंमतीची जास्त चर्चा; चाहते म्हणाले ऐवढ्या पैशात...

रोज दूध कसं आणलं आणि त्याचा व्यापार कसा केला? 

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रकाश इमडे यांच्याकडे चार एकर वडिलोापर्जित कोरडवाहू जमीन (Dry Land) होती. वडिलोपार्जितच असलेल्या या जमिनीवर व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरवले. तेव्हापासून मग त्यांनी एक गाय विकत घेतली आणि या एकाच गायीपासून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्या या व्यापाराचा व्याप 150 गायींच्या हिशोबानं वाढला आहे. रोज 1 हजार लिटर दूध ते डेअरीपर्यंत यातून पोहचवतात. 

प्रकाश इमडे यांचे हे कष्ट पाहून सर्वच तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. इतक्या वर्षांचा अनुभव आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यांमुळे प्रकाश यांना चांगलेच यश मिळाले आहेत. त्यांच्या व्यवसायात साथं दिलेल्या त्यांच्या गायीचा फोटो त्यांनी देवघरात लावला आहे. त्यांनी व्यवसायातून मिळालेल्या पैशांतून बांधलेल्या बंगल्याला गोधन असं नावं दिले आहे. घरावर या गायीचा आणि दुधाच्या किटलीचाही पुतळा त्यांनी बांधला आहे.