सांगली महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचे आमरण उपोषण

अपुऱ्या नागरी सुविधा आणि विरोधी नगरसेवकांच्या विकास निधीच्या अडवणूकीविरोधात हे आंदोलन

Updated: Jun 18, 2019, 02:57 PM IST
सांगली महापालिकेतील राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांचे आमरण उपोषण title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : विविध मागण्यांसाठी सांगली महापालिकेतील राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आमरण उपोषणास बसले आहेत. माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक मैनुद्दीन बागवान, नगरसेवक अत्तहर नायकवडी, नगरसेविका नर्गिस सययद हे आमरण उपोषण करत आहेत. मिरजतील प्रभाग 6 मधील अपुऱ्या नागरी सुविधा आणि विरोधी नगरसेवकांच्या विकास निधीच्या अडवणूकीविरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

नेहमी अपुऱ्या नागरी सुविधा बाबत नागरिक आंदोलक करत असतात. सांगलीत मात्र चक्क नगरसेवकांनीच आंदोलन सुरु केले आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अपुरे आणि दूषित पाणी नागरिकांना मिळत आहे. ड्रेनेजच सांडपाणी उघड्यावर आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. या बाबत पाठपुरावा करून देखील मनपा प्रशासन या भागाकडे जाणुनबाजूनं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रभाग सहामध्ये चारही नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. तर महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे येथील नागरी सुविधांवरून राजकारण सुरू झालं आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेसाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. या निधीमधून देखील प्रभागाला महापालिका प्रशासनाने वगळल्याचा आरोपी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे.