संघर्षाला हवी साथ : परिस्थितीपुढे हात टेकण्यास आशफियाचा नकार

 मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतंच

Updated: Aug 11, 2018, 11:11 AM IST

माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात राहणाऱ्या आशफियानं दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के मिळवलेत. तिच्यासाठी हे यश सोपं मुळीच नव्हतं... मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतंच, याचं उत्तम उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या पवना तालुक्यातली आशफिया खान...

भाईतलाव परिसरात तिचं छोटंसं घर आहे.... घरची परिस्थिती अत्यंत बेताची.... वडील हाताला मिळेल ते मजुरीचं काम करतात, ठोस अशी नोकरी नाही. आशफिया कुठल्याही शिकवणीला जात नव्हती... तिनं फक्त नेटानं अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेत आशाफियानं ९५. ४० टक्के मिळवलेत. 
 
शिक्षकांनाही आशफियाच्या यशाचा अभिमान आहे. आशफियाला कलेक्टर व्हायचंय... पण परिस्थितीमुळे ते सोपं नाही... म्हणूनच आशफियाला मदत करण्यासाठी पुढे या... 

परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...  

तुम्हालाही मदत करायची असल्यास संपर्क करा

संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६

पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला, 

ए विंग, मॅरेथॉन टॉवर, 

लोअर परळ, मुंबई - ४०००१३

ई-मेल : havisaath@gmail.com