अमर काणे, झी मीडिया, नागपूर : महागड्या दुचाकी,चारचाकी वाहनं तुम्ही पाहिल्या वा काहींवर सफरही केली असेल...मात्र नागपुरातील संदीप जवंजाळ यांनी तब्बल 5 लाख 70 हजारांची सुपर लाईट सायकल खरेदी केलीय...कार्बन फायबर सायकल सर्वाचंच लक्ष वेधून घेतेय. संदीप यांच्याकडे आलिशान कार्स आहे..मात्र त्यांच्या जीवनात अविभाज्य घटक असलेली ही सायकल त्यांच्या बेडरुपमध्ये पार्क असते.
संदीप यांच्या घरी आली शान चारचाकी आहे...मात्र संदीप हे सायकलिंगचे निस्सिम भक्त...नित्यनियमानं सायकलिंगनंच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते..त्यांच्या नव्या सायकलची किंमत ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल..तब्बल 5 लाख 70 हजारांची प्रोपेल एडव्हान्स SL( सुपर लाईट) वन सायकल त्यांनी खऱेदी केलीय. बालपणापासून संदीप यांना सायकलिंगची आवड..
सोलो राईड करत ते विकेंडला अगदी दीडशे ते 200 किलोमीटर पर्यंतचा ते सायकलिंग करून येतात.... आपल्या व्यस्त जीवनशैलित फिटनेस व ताणतणातून मुक्तीच्या दृष्टीनं सायकलिंगचा खूप फायदा होतोय.. त्यामुळं अत्याधुनिक सायकल घेण्याचा त्यांचा अनेक दिवसांपासून विचार सुरु होता...त्यातूनच त्यांनी तायवानच्या जायन्ट कंपनीची हीसुपर लाईट सायकल घेतली. चांगल्या रस्त्यावर अगदी सहजपणे सर्वसामान्य सायकलपटूही ताशी 25 किलोमीटर वेगानं ही एअरोडायनामिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली ही सायकल चालवू शकतो.
सायकल म्हणजे संदीप जिवनाचा अविभाज्य घटक असल्याचं ते सांगतात.त्यांच्या महागड्या गाड्या पार्किंगमध्ये असतात,मात्र ही सुपर लाईट सायकल त्यांच्या बॅडरुमध्ये पार्क असते.
-- अवघ्या साडेसात किलो वजनाची
-- कार्बन फायबर सायकल
- ट्युबलेस टायर विथ ऑटो पंक्चर रिपेअर
- गियर सेन्सर सिस्टीम
-- सिंगल मोल्ड सायकल ( नो जॉईन्ट )
- ब्लेड स्पोक
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गेल्या महिन्यांपासून दिवसांपासून सायकलिंगकडे कल वाढला आहे..मात्र त्याचबरोबर महागाड्या दुचाकी वा चारचाकीऐवजी फिटनेससाठी उपयुक्त अत्याधुनिक सायकल खऱेदीकरणारे वाढले आहेत.