प्रवाशांनो लक्ष द्या! समृद्धी महामार्गावर दोन दिवस 4 तासांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग पाहा

Samruddhi Mahamarg Block Update: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय आहे. या दोन्ही महामार्गावर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 21, 2023, 12:34 PM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! समृद्धी महामार्गावर दोन दिवस 4 तासांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग पाहा title=
samruddhi mahamarg will closed on tuesday and wednesday for 4 hour

Latest News on Samruddhi Mahamarg: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत जप तुम्हीही समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. समृद्धी महामार्गावर मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महामार्गावरील तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे. (Samruddhi Mahamarg And Mumbai pune Expressway)

समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान वाहतूक दोन दिवस बंद असणार आहे. पॉवर ग्रिड ट्रान्समिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे. त्यासाठी मंगळवारी आणि उद्या बुधवारी दोन्ही बाजूंची वाहतूक दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद असेल. तर उर्वरित काळात वाहतूक सुरळीत सुरू असणार आहे. तर, ब्लॉकच्या काळात वाहतूक पर्यायी मार्गावरुन वळवण्यात येणार आहे. 

जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान समृद्धी महामार्गावरील (Jalana To Sambhaji Nagar Samruddhi Highway) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. जालना इंटरचेंज १४ ते सावंगी इंटरचेंज १६ दरम्यान नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक निधोना (जालना) इंटरचेंज १४ मधून बाहेरपडून निघोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ अ (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंद्रीज शाळेपर्यंत असेल. नंतर वाहणे उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज १६ (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करून शिर्डीकडे रवाना केली जातील.

शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतुकीतदेखील बदल होणार आहे. सावंगी इंटरचेंज 16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज 14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. 

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (२१ नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा(एमएसआरडीसी)कडून देण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.