वटपौर्णिमा निमित्ताने रुपाली चाकणकरांनी दिला महिलांना अनोखा संदेश

माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही आपण लग्न झाल्यापासून एकदाही वड पुजला नाही. माझ्या पतीने आणि सासरच्यांनी माझा हा पुरोगामी विचाराचा निर्णय मान्य केला आहे. अशी कबुली रुपालीताईंनी कार्यक्रमात दिली आहे.  

Updated: Jun 13, 2022, 05:26 PM IST
 वटपौर्णिमा निमित्ताने रुपाली चाकणकरांनी दिला महिलांना अनोखा संदेश  title=

मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर नेहमीच आपल्या पुरोगामी विचाराने समाजात वावरताना पाह्यला मिळतात. अशाच संदेश वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला रुपाली चाकणकर यांनी महिलांना दिला आहे. एका कार्यक्रमादरम्यान चाकणकर यांनी वटपौर्णिमेचा किस्सा सांगितला आहे. माझा आणि वटपौर्णिमेचा फारसा संबंध येत नाही आपण लग्न झाल्यापासून एकदाही वड पुजला नाही. माझ्या पतीने आणि सासरच्यांनी माझा हा पुरोगामी विचाराचा निर्णय मान्य केला आहे. अशी कबुली रुपालीताईंनी कार्यक्रमात दिली आहे.  

वडाला धाग्यात बांधणे चुकीचे
वड हे झाड जास्त ऑक्सिजन पुरवणारे झाड आहे त्याला असे प्रकारे धाग्यात बांधणे आपल्याला आवडत नसल्याचे चाकणकर यांनी कार्यक्रमात जाहीर सांगितले. राजकीय दौऱ्याच्या निमित्ताने बाहेर फिरताना असताना मी अनेकदा पाहिले की वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धागा बांधल्याने झाड एका बाजूला झुकलेले असते असा अनुभव चाकणकरांनी उपस्थितींना सांगितला. 

समाजाच्या भीतीपोटी वटपौर्णिमेची पूजा 
वटपौर्णिमेच्या दोन ते तीन दिवस आधी नवरा मारहाण करतो म्हणून आमच्याकडे महिलेच्या तक्रार येतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी त्याच महिला सात जन्म हाच नवरा मिळावा याकरिता पुजाअर्चा करतात. अश्या महिलांना मी विचारते हा काय प्रकार आहे? तर त्या महिलेचे उत्तर असते समाजाला काय वाटेल किंवा नवऱ्याला काय वाटेल या भीतीपोटी त्या वटपौर्णिमेची पुजा करतात असा अनुभवही चाकणकरांनी सांगितला. 

खऱ्या सावित्रीला आठवणीत ठेवा 
सत्यावानाची जीव वाचवणारी आणि वडाची पुजा करणारी सावित्री आम्हाला समजली पंरतू ज्या सावित्रीने आपल्यासाठी अंगाखाद्यांवर शेण आणि मातीचे गोळे झेलणारी महात्मा फुले यांची सावित्री समजली नाही हे समाजाचे दुर्देव आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. जोपर्यंत सावित्री फुले कळत नाही तोपर्यत आपला विकास होणार नाही आज माझ्यासह अनेक महिला समाजात अनेक उचस्थ पदे भुषवतात ते फक्त सावित्रीबाई फुलेमुळे त्यामुळे महिलांनी त्यांना नेहमी लक्षात ठेवले पाहिजे असा संदेश रुपाली चाकणकर यांनी महिलांना दिला.