सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच कोरोना नियमांचा विसर, 500 कार्यकर्त्यांसह काढली रॅली

कोरोनाचं संकट समोर असताना सत्ताधारी आमदारांकडूनच अशा प्रकारे वर्तन

Updated: Feb 19, 2021, 09:09 PM IST
सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच कोरोना नियमांचा विसर, 500 कार्यकर्त्यांसह काढली रॅली title=

अकोला : अकोल्यात कोविड- १९ च्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत राज्य शासनाने काही मार्ग दर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र त्याचं उल्लंघन सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने केलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मुळगाव कुटासा येथे भव्य रॅली काढली आहे.

या भव्य रॅलीत सुमारे ५०० कार्यकर्ते सामील होते. सत्तेत असलेल्या आमदारालाच नियमांचा विसर पडत असेल तर सामान्य नागरिकांना दोष का द्यावा असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान यावरून भाजपने जोरदार टीका केली आहबे. अमोल मिटकरींविरोधात भाजप तक्रार दाखल करणार आहे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाच कोरोना नियमांचा विसर झाल्याने त्यांच्यावर आता विरोधक टीका करत आहेत. कुटासात शिवजयंती सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे आधीच चिंता वाढल्या असताना अशा कृतींमुळे कोरोना वाढल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.