विजयादशमी उत्सव २०२० : 'CAA मुळं नागरिकत्व धोक्यात नाही'

विजयादशमी उत्सव २०२०

Updated: Oct 25, 2020, 09:13 AM IST
विजयादशमी उत्सव २०२० : 'CAA मुळं नागरिकत्व धोक्यात नाही' title=
छाया सौजन्य- एएनआय

नागपूर : Coronavirus  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या संघटनांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारे कार्यक्रम अतिशय थोड्याथोडक्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सावधगिरी बाळगत घेण्यात आलेल्या याच निर्णयाच्या धर्तीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवही यंदाच्या वर्षी रेशीमबागेऐवजी महर्षी व्यास सभागृहात पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नागपूरात हा सोहळा पार पडत असून, याकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. यंदाच्या वर्षी संघाच्या पारंपरिक सोहळ्याचं चित्र पाहता येणार नसलं तरीही, सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र ऑनलाईन माध्यमातून स्वयंसेवकांना आणि देशाला मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राम मंदिरापासून सीएएपर्यंत आणि देशातील कोरोना स्थितीपर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. 

 

सीएएला काहींनी विरोध केला, पण यामुळं कोणाचंही नागरिकत्व मात्र धोक्यात आलेलं नाही असं मोहन भागवत म्हणाले. तर, राम जन्मभूमीचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या निर्णयाचं स्वागत केलं.