सातारा : साताऱ्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध कास पठाराकडे जाणारा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यामुळे सुरूवातीला संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली होती.
मात्र पुन्हा एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रस्ता पुन्हा नव्याने दुरूस्त केल्याशिवाय दुहेरी वाहतूक सुरू करणे कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे.
साताऱ्यात या वर्षात दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला आहे. या आधीही साताऱ्याच्या घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.