दरडीचा धोका, माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद

अनेक दिवसांच्या विश्रातीनंतर पावसाला चांगली सुरुवात झाली. या पावसाचा धोका माळशेज घाटाला बसण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन आजपासून दोन दिवस माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. 

Updated: Jul 15, 2017, 09:30 AM IST
दरडीचा धोका, माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद title=

मुंबई : अनेक दिवसांच्या विश्रातीनंतर पावसाला चांगली सुरुवात झाली. या पावसाचा धोका माळशेज घाटाला बसण्याची शक्यता आहे. दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन आजपासून दोन दिवस माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. 

आठवड्याच्या विश्रातीनंतर कालपासून सुरु झालेल्या पावसाचा तडाखा नाशिक, कोकणाला बसला. कोकण रेल्वेवर कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक अडीच तास ठप्प होती.

आता माळशेज घाटात दरड कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.  घाटात जोरदार पाऊस सुरु असून कमी प्रमाणात दरड रस्त्यावर आली आहे. काही ठिकाणी माती पावसामुळे खाली येत आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका उद्धभवू शकतो.