पावसाने रायगडात उभ्या भातपीकाचे मोठे नुकसान

शुक्रवारी संध्याककाळपासून सुरू झालेल्याा पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचे माठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाउस रात्री उशिरापर्यंत सुरू होता . त्यामुळे कापणी योग्य झालेली भाताची रोपे आडवी झोपली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यात कुजायला सुरूवात झाली आहे. 

Updated: Oct 7, 2017, 10:53 PM IST
पावसाने रायगडात उभ्या भातपीकाचे मोठे नुकसान title=

रायगड : शुक्रवारी संध्याककाळपासून सुरू झालेल्याा पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचे माठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाउस रात्री उशिरापर्यंत सुरू होता . त्यामुळे कापणी योग्य झालेली भाताची रोपे आडवी झोपली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यात कुजायला सुरूवात झाली आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. यंदा जिल्हयात एक लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली . पाऊसमान अतिशय चांगले असल्यााने पीकही चांगले आले होते परंतु अचानक आलेल्या  पावसाने शेतकऱ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे. 

आता भिजलेले पीक झोडून वाळवून नुकसान आळण्यांचा प्रयत्न सुरू आहे. येत्या दोन दिवसात पावसाची शक्याता हवामान खात्याने वर्तवली असल्याने पीकांची कापणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे .