भंडाऱ्यात ४९ केंद्रांवर उद्या पुन्हा मतदान

निवडणूक आयोगानं घेतला निर्णय

Updated: May 29, 2018, 08:40 PM IST
भंडाऱ्यात ४९ केंद्रांवर उद्या पुन्हा मतदान title=

भंडारा : भंडारा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर उद्या फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. सोमवारी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. त्यावेळी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे बराच काळ मतदान थांबवावं लागलं होतं. आता उद्या या ४९ केंद्रांवर उद्या सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

उद्याच्या फेरमतदानावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटांना शाई लावण्यात येणार आहे. दरम्यान भंडारा गोंदियाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची मतदानातल्या घोळानंतर बदली करण्यात आली आहे. समन्वयाचा अभाव असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आता कादंबरी बलकवडे गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत. भंडारा-गोंदियात कुठल्या मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

पाहा व्हिडिओ