नाणार प्रकल्पावरुन अधिवेशनात शिवसेना आक्रमक होणार

नाणार जाणार की राहणार ?

Updated: Jul 1, 2018, 10:37 PM IST
नाणार प्रकल्पावरुन अधिवेशनात शिवसेना आक्रमक होणार  title=

मुंबई : नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती. मात्र प्रकल्पाला विरोध असल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली. येत्या अधिवेशनात शिवसेना आक्रमक होणार असून प्रकल्प रद्द करण्यासाठी भाग पाडेल असंही खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.