मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा जवळील खडीकोळवण येथे मुसळधार ( Rain in Ratnagiri) पावसाचा फटका बसला आहे. खडीकोळवण येथे डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला ( (Landslide at Khadikolvan) असून काही घरांना धोका पोहोचला आहे. तर काही ठिकाणी डोंगराला भेगा गेल्या आहेत. रस्ताही खचला आहे. तसेच रस्त्यावर दरड आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गावाचा संपर्क तुटला आहे. (Landslide at Sakharpa-Khadikolvan)
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. (Ratnagiri Rain) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जवळील खडीकोळवण येथे दरड कोसळल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोसळलेल्या दरडीची माती घरांवर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकोळवण हे गाव सह्याद्रीच्या खुशीत वसले आहे. गावाच्या चारीबाजूनी डोंगर असून विशाल डोंगरांच्या मध्यभागी खोऱ्यात गाव वसले आहे. त्यामुळे धोका अधिक आहे.
साखरपा-खडीकोळवण येथे दरड कोसळली
रत्नागिरी । साखरपा जवळील खडीकोळवण येथे मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला असून काही घरांना धोका पोहोचला आहे. डोंगराला भेगा गेल्या आहेत. रस्ताही खचला #Rain #Ratnagiri #MaharashtraRains #Maharashtra pic.twitter.com/MlW1aQp1Yn— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 24, 2021
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर खचल्याने पावसामुळे डोंगराची माती वाहून खाली आली असून चिखल साचला आहे. काही घरांना धोका पोहोचला आहे. पाऊस असाच पडत राहला तर खडीकोळवण गावाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलेले नाही. त्यामुळे खडीकोळवण येथील ग्रामस्थ मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
रत्नागिरी । महाड-तळीये आणि पुण्यातील माळीण येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. साखरपा जवळील खडीकोळवण येथे मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. डोंगर खचल्याने मातीचा ढिगारा कोसळला असून काही घरांना धोका पोहोचला आहे. डोंगराला भेगा गेल्या आहेत. रस्ताही खचला #Rain pic.twitter.com/1FrqMCCEI0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 24, 2021
काही ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या आहेत. तसेच रस्ताही खचला आहे. डोंगराचा काही भाग रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा साखरप्याशी संपर्क तुटला आहे.