रत्नागिरीमध्ये घरावर दरड कोसळली

खेडमधील नातूनगर गावातील एका घरावर दरड कोसळली आहे. 

Updated: Aug 3, 2019, 07:16 PM IST
रत्नागिरीमध्ये घरावर दरड कोसळली title=

खेड : खेडमधील नातूनगर गावातील एका घरावर दरड कोसळली आहे. यात घर पूर्णत: जमिनदोस्त झाले आहे. मात्र दरड कोसळली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. 

नातूवाडी धरण असलेल्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची 20 घरे आहेत. या प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या बाजूलाच असणारी दरड कोसळली. सुदैवाने कोणीही घरात नव्हते. मात्र या दरडमुळे इतर 20 घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रशासनाकडून या भागाची पाहणी करण्यात आली आहे. पाहणीनंतर या प्रकल्पग्रस्तांसाठी स्थलांतराचा किंवा पर्यायी जागेचा निर्णय घेण्यात येणार आहे.