चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी रामदास आठवलेंनी दिला 'हा' सल्ला

हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.  

Updated: Jun 19, 2020, 06:09 PM IST
चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी रामदास आठवलेंनी दिला 'हा' सल्ला title=

मुंबई : भारत-चीन लडाख सीमा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे सर्व चिनी  वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या चर्चा रंगत आहेत. चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर भारताने केला पाहिजे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिकटॉकचा वापर करतात. त्यामुळे चीनला कोट्या कोट्यावधींचा फायदा होतो. त्यामुळे  ते रोखण्यासाठी आणि चीनची आर्थिकदृष्ट्या कंबर मोडण्यासाठी चीनच्या मालावर जशी बंदी घालणे आवश्यक आहे. तसेच चिनी व्हिडीओ ऍप टिकटॉक वर भारतात बंदी घालावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

चीनने लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर नियोजनबद्ध भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख उत्तर दिले. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यांना आठवले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली.  या हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

सुरक्षित अंतर ठेवून मास्क घालून रिपाइंचे कार्यकर्ते चीनचा राज्यात सर्वत्र निषेध करणार आहेत. अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली. रामदास आठवले यांनी चिनी पदार्थांवर देखील बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, चीन मधील ग्रेट वॉल मोटर्स या कंपनीशी पुण्यातील तळेगाव येथे स्पोर्ट कार बनविण्याचा प्रकल्प उभा करण्यासाठी ७ हजार ६०० कोटींचा करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला आहे. हा करार उद्धव ठाकरे यांनी त्वरित रद्द करावा आणि चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.