सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा

वातावरण तंग असताना सुद्धा ना दगड ना लाठी असा शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2018, 07:24 PM IST
सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा title=

सांगली : कोरेगाव भीमा प्रकरणातील दोषींवर लवकर कारवाई करावी, या मागणीसाठी आज सांगलीमध्ये बहुजन संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं. 

शांततेत भव्य मोर्चा

हजारो आंदोलक या मोर्च्यात सहभागी झाले होते. वातावरण तंग असताना सुद्धा ना दगड ना लाठी असा शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. 

मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून ह्या मोर्चाला सुरुवात झाली. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांच निवेदन देण्यात आलं. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.