'...अन्यथा मुंबईचा दूध पुरवठा रोखणार'

मुंबई शहराला होणारा दूध पुरवठा स्वाभीमानी शेतकरी संघटना रोखणार आहे.

Updated: Jul 6, 2018, 06:17 PM IST

कोल्हापूर : मुंबई शहराला होणारा दूध पुरवठा स्वाभीमानी शेतकरी संघटना रोखणार आहे. गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान मिळावं  या मागणीसाठी १६ जुलैपासून स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं आयोजीत केला आहे. कोल्हापूरातील शाहू स्मारक इथं आयोजित केलेल्या मेळाव्यात खासदार राजु शेट्टी बोलत होते.