ठाकरे आणि पवारांच्या सौ.पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र

आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र काम करू, असं आवाहन यावेळी केलं आहे.

Updated: Nov 13, 2017, 01:38 PM IST
ठाकरे आणि पवारांच्या सौ.पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र title=

पुणे : पुण्यात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना राजकारण बाजूला ठेवून, आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र काम करू, असं आवाहन केलं. 

धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांचा सत्कार

पुण्यात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे बोलत होत्या. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला.

सुनेत्रा पवार यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन 

यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

जाहीर कार्यक्रमामधून त्यांची हजेरी वाढतेय. मात्र आपण शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रातच काम करू, राजकारणात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.