रायगड : रायगडच्या पेण तालुक्यातील वरसई इथे शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिल्पा नाग्या शिद असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. शिल्पा शाळेतून बाहेर पडली आणि तिचा गळफास लावलेला मृतदेहच आढळून आला.
याप्रकरणी ती हरवल्याची तक्रार पेण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. जावळी जंगल भागात तिचा मृदहेह सापडला. मृत मुलीच्या नातेवाईकांनी मुलीच्या मृत्युबाबत संशय व्यक्त केलाय.
दरम्यान याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी सांगितलं. मृत शिल्पाचं मूळ गाव पेण तालुक्यातील तांबडी आहे. दोनच दिवसांपूर्वी तिचे आईवडील तिला भेटून गेले होते.